मनोरंजन

मास्तर ... बबन्या सांग पाहू तू मोठा झाल्यावर काय करणार ?
बबन्या ... लग्न .
मास्तर ... नाही रे बाळा मला म्हणायचंय की तू कोण बनणार ?
बबन्या ... नवरा .
मास्तर ... अरे मला असं म्हणायचंय की मोठा झाल्यावर तू काय मिळवणार ?
बबन्या ... बायको .
मास्तर ... अरे मुर्खा म्हणजे मोठा झाल्यावर आईबापासाठी काय करणार ?
बबन्या ... सून आननार .
मास्तर ... अरे रताळ्या तुझ्या बापाला तुझ्याकडून काय पाहिजे ?
बबन्या ... नातू .
मास्तर ...  देवाऽऽऽऽ अरे भुसनळ्या तुझ्या जीवनात काय अपेक्षा आहेत तुझ्याकडून ?
बबन्या ... हम दो हमारे दो ....
मास्तर कोमात... बंड्या जोमा





झनझनित ऊखाणा
म्हातारा म्हणतो
म्हातारीला
तुझ्यावर प्रेम करता करता संपले माझे
जीवन,
.
आले म्हातारपण
पडले दात पण.
.
.
.
तरीपण थेरडे ...
"तुझ्यासाठी कायपण".....





नक्की वाचा खुप छान आहे..
एकदा एका ४ वर्षाच्या लहान मुलाने
त्याच्या आईला अगदी निरागस पने एक प्रश्न विचारला...

आई तू तुझी पर्स ज्याच्यात तू पैसे
अणि तुझे दागिने ठेवतेस ती तू
आपल्या कड़े असलेल्या कामवाली कड़े काही वेळासाठी ठेवशील का?

आई म्हणते :- का रे असा का विचारतोय मी तिच्या कड़े नाही ठेवणार, माझा तिच्यावर विश्वास नाहीये..
मुलगा (अगदी शांतपणे विचारतो) :- मग मला तू तिच्यासोबत दिवसभर
कशी ठेवतेस ???



मराठी स्क्रॅप - नक्की वाचा ही गोष्ट...आणि आवडल्यास शेअर
करा...!!!
एक आंधळा भिकारी रस्त्यावर
एका बाजूला बसलेला... त्याच्याकडे कुणाचेही लक्ष
नाही... तो एव्हढा दरिद्री आहे की त्याला अश्रू
देखील महाग झालेत.... गेली कित्येक वर्षे
तो रडलेला नाही.
.
.
एक लेखक पूर्णपणे दिवाळं वाजलेला...
.
.
.
खिचात दमडादेखील नसतांना तो लेखक फिरायला बाहेर
पडतो.
.
.
त्याची नजर त्या भिका-याकडे
आणी त्याच्या त्या करूण अवस्थेकडे जाते.
.
.
त्या भिक-याच्या बाजूला एक पाटी आणि दोन-तीन
खडू पडलेले.
.
.
हा लेखक त्या भिक-याकडे जातो आणि म्हणतो..
.
.
"मित्रा, मी एक लेखक आहे,ज्याच्याकडे एक
दमडादेखील नाही, पण माझ्याकडे
कला आहे,...माझ्याकडे शब्दांची शक्ती आहे..
ती मी तुला देउ शकतो...तुझ्या परवानगीने
मी या पाटीवर काही लिहू का?"
.
.
"साहेब" भिकारी म्हणतो "
माझ्याशी कुणी बोलतदेखील नाही ...मी एक गरीब
आंधळा भिकारी ...तुम्हाला त्या पाटीचं जे ठीक वाटतं
ते करा."
.
.
तो लेखक त्या पाटीवर काहीतरी लिहून निघुन जातो.
.
.
त्या क्षणापासून भिका-याच्या लक्षात येते की,
एकदम जाणा-या येणा-यांपैकी प्रत्येकजण
त्याच्याजवळ थांबून त्याच्यापूढ्यात पैसे टाकू
लागलाय.
.
.
थोड्याच वेळात तिथे पैशाची रास जमते...
.
.
तो भिकारी बेचैन होतो...नाण्यांची रास वाढतच
जाते...
.
.
तो एव्हढा अस्वस्थ होतो की पैसे टाकणा-
यांपैकी एकचा हात पकडतो आणि म्हणतो " साहेब
माफ करा तुमचा हात पकडल्याबद्दल ... मी एक
गरीब आंधळा भिकारी आहे...मला कृपा करुन जर
या पाटीवर काय लिहीलंय ते वाचून दाखवलेत तर फार
उपकार होतील."
.
.
तो माणूस पाटी उचलतो आणि वाचायला लागतो...
.
.
.
.
"वसंत ऋतू, बहरलेली सृष्टी,
आणि माझ्या नशिबी हरवलेली दृष्टी."
.
.
.
.
भिका-याच्या गालावरुन अश्रू ओघळायला लागतात.
.
.
.
आयुष्य कुणी जास्त जाणलं?
या ओळी लिहीणा-या लेखकानं? त्या ओळी वाचून पैसे
टाकणा-या लोकांनी? कि इतक्या वर्षांनी रडणा-
या त्या भिका-यानं??
तुमचे डोळे चांगले असतील तर तुम्ही जगाच्या प्रेमात पडाल
पण जर तुमची जीभ गोड असेल तर हे जग तुमच्या प्रेमात पडेल...
माणसाला बोलायला शिकण्यास (किमान ) २ वर्ष लागतात ...
पण "काय बोलावे" हे शिकण्यास पूर्ण आयुष्य निघून जाते...



एकदा एका शाळेंत डेप्युटी शाळा तपासायला आले.एका वर्गांत त्यांनी फळ्यावर
'NATURE' अशी अक्षरे लिहिली आणि एका मुलाला विचारले "हा काय शब्द" आहे?
क्षणाचाही विलंब न लावता मुलगा म्हणाला " नटुरे" त्यानंतर एक एक करून सर्व
मुलांना तोच प्रश्न विचारला.सर्व मुलांनी तेच सांगितले "नटुरे". डेप्युटी संतापले. शिक्षकाला म्हणाले " हा काय प्रकार आहे?" शिक्षक उत्तरले " पोरं अजून 'मटुरे'
(mature ) झालेली नाहीत...नंतर सुधारतील." डेप्युटी वैतागून सर्वांना घेवून हेड- मास्तरांकडे गेले व त्यांना झालेला किस्सा सांगितला.त्यावर शांतपणे हेडमास्तर
म्हणाले." जाऊ द्या हो साहेब! या गोष्टीचा त्यांच्या 'फुटुरे'(future )वर कांहीच परिणाम
होणार नाही!"





तरुणपणातिल चैनिना नावे ठेवावयाची ही म्हातार पणची खोडच आहे.
 - सुसान सेंटलिव्हर
#MarathiPride
परिस्थिती कितीही दुदैवी असू दे, त्यातून हुशार माणसे काहीतरी फायदा करुन दाखवतातच. सर्व प्रकारच्या परिस्थितीचा कोणता तरी फायदा करुन घेता येतोच.
 - ला रोशेकॉक
#MarathiPride
आठवणी संभाळण खूप सोप्प असत ,
 कारण त्या मनात जपून ठेवता येतात ,
 पण क्षण संभाळण खूप कठीण असत ,
 कारण प्रत्येक क्षणात अनेक आठवणी असतात ........